सामुहिक विवाह

शबरी सेवा समितीचे माध्यमातून २०/१/१९ रोजी अळीव माळ तालुका जव्हार येथे ५६ गरीब वनवासी जोडप्यांचे सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला. जव्हार, मोखाडा, दादरा नगर हवेली, गुजराथ, वाडा, विक्रमगड ई भागातील ही जोडपी होती. ठाणे येथील अंजली काळे यांच्या मंडळाने पौरोहित्य केले. सर्व जोडप्यांना संसार उपयोगी भांडी, कपडे,ब्लँकेट अशा अनेक वस्तू भेट देण्यात आल्यात. उपस्थित २५०० मंडळींचे पुलाव, छोले व बुंदी लाडू असे छान जेवण झाले. डोंबिवली, ठाणे, वाशी, नाशिक, पालघर, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून शबरी सेवा समिती चे कार्यकर्ते व हितचिंतक देणगीदार आले होते. गणपती पूजन, मंगलाष्टके, सप्तपदी असे हिंदू धर्मातील प्रमुख विवाह विधी व्यवस्थित रीतीने पार पडले. एवढा मोठा भव्य कार्यक्रम अत्यंत शिस्तीत व वेळे नुसार संपन्न झाला. सर्व विधी, व उपस्थित २५०० मंडळींचे जेवण दुपारी २ पर्यंत पूर्ण झाले. शबरी सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते गेले महिनाभर या कार्यक्रमासाठी धडपड करीत होते. एवढा भव्य कार्यक्रम अत्यंत शिस्तीत व नियोजित वेळेत पूर्ण झाल्या बद्दल सर्वांना आश्चर्य वाटले. अनेक देणगी दारांनी त्यांच्या देणगीचा अत्यंत योग्य विनियोग होत असल्या बद्दल संस्थे बद्दल १०१ टक्के विश्वास व्यक्त केला व संस्थेला पुढील काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Translate »