सामुहिक डोहाळजेवण

ग्रामीण, आदिवासी भागात मुलांच्या कुपोषणाची सुरूवात त्यांच्या मातांपासूनच सुरू होते. मातांचे प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे. म्हणून संस्था सुरूवातीपासूनच गर्भवती महिलांच्या प्रबोधनासाठी सामुहिक डोहाळजेवणाच्या कार्यक्रमांचे आयोजन करत आहे. गर्भवती महिलांची डाॅक्टरांकडून तपासणी, त्यांचा आहार, गर्भारपणात घ्यावयाची काळजी, नियमितपणे लोहाच्या गोळ्या घेणे , बाळंतपण दवाखान्यात करणे वगैरे सर्व गोष्टी ह्या कार्यक्रमात सांगितल्या जातात. हिरवे मूग, शेंगदाणे व गूळ अशी ओटी भरली जाते. 

Translate »