संस्थेच्या कार्याची ठळक उपलब्धी ( 2018 पर्यंत )

 • आरोग्य
 • कर्जत तालुक्यातील कुपोषणामुळे होणरे बालमृत्यू थांबविण्यात संस्थेला यश.
 • संस्थेच्या प्रयत्नांतून 7500 बालके कुपोषणमुक्त
 • 300 बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया.
 • कर्जत, मुरबाड, शहापूर तालुक्यात गर्भवती महिलांकरिता सामुहिक डोहाळजेवणांचे निमित्त कार्यक्रम.
 • महाराष्ट्रातील अतिदुर्गम अश नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात कुपोषण निर्मूलनाचे कार्य.
 • शैक्षणिक
 • कशेळे, ता. कर्जत येथे 15 विद्यार्थी व 5 विद्यार्थिनींकरीता विनामूल्य वसतीगृह.
 • कर्जत व जव्हारमध्ये एकूण 15 बालवाड्या.
 • कर्जत व जव्हारमध्ये चार स्थानी अभ्यासिका
 • कर्जत, जव्हारमधील 2500 विद्याथ्र्यांना दरवर्षी विनामूल्य शैक्षणिक साहित्याचे वाटप
 • दरवर्षी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विविध शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन
 • पुस्तकहंडीच्या कार्यक्रमांतून आत्तापर्यंत 10,000 पुस्तकांचे शाळांमध्ये वाटप.
 • कर्जत, मुरबाड, जव्हारमधील 300 अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण.
 • कृषी विकास व जलसंधारण
 • जव्हार तालुक्यांतील 35 गावांतील 400 शेतक-यांच्या शेतांवर फलोद्यान विकासाचा महत्वाकांक्षी उपक्रम यशस्वितेकडे. एकूण 7145 आंबा व इतर वृक्षांची लागवड यशस्वी
 • टाकळी, जि. नंदुरबार हे गांव कृषि विकासातून स्वावलंबनाकडे. गावातील 45 लोकांचे गुजराथ मध्ये होणारे स्थलांतर पूर्णपणे थांबले
 • वावी, ता.धडगांव या गावांत सिंचनाकरिता विहिरीचे बांधकाम
 • जंगलपाडा, ता.जव्हार या गावात जलस्त्रोत विकासा अंतर्गत बंधारा बांधकाम.
 • जांभुळवाडी, ता.कर्जत या भीषण पाणीटंचाई असलेल्या गावात विहिरीचे बांधकाम
 • पाच पाड्यांच्या पिण्याच्या पाणी प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय
 • तेलंगवाडी, ता.कर्जत येथे बोअरवेल निर्माण.
 • सामाजिक
 • दरवर्षी गरीब, गरजू आदिवासी जोडप्यांचे सामुहिक विवाह
 • दिवाळीत 25 ते 30 आदिवासी पाड्यातील बालकांना दिवाळी फराळवाटप