शेती विकास - फलोद्यान विकास

आदिवासी समाज प्रामुख्याने शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना शेतीतून अधिकाधिक उत्पन्न मिळावे व त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे या हेतूने हा उपक्रम राबविला जातो. चांगल्या प्रतीचे भाजीपाला बियाणे देणे, आंबा, काजू, साग, बांबू अशी आर्थिक स्त्रोत निर्माण करणारी झाडे देणे अशा प्रकारचे काम संस्थेमार्फत केले जाते. नंदुरबार जिल्ह्यात वावी या गांवी संस्थेने एका विहिरीसाठी आर्थिक मदत केली. ज्यामुळे 10-12 शेतकरी उन्हाळी भाजीपाला करू श्कतात. ज्यांना लांबून पाणी आणून भाजीपाला करावा लागतो त्यांना पाईप, पंप अशासाठीही संस्थेने मदत दिली आहे.

जव्हार तालुक्यात व नंदुरबार जिल्ह्यात हे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत.

Translate »