युवती शिबीर - अर्थात युवतींचा सर्वांगीण विकास

वय वर्षे तेराच्या पुढील मुली ज्या भावी माता – कुटुंबाचा व समाजाचा कणा आणि भारताच्या भावी नागरिक. अशा सर्व भूमिकांमध्ये तिने सक्षम व्हावे, सुदृढ व्हावे व आत्मविश्वासाने उभे राहावे यासाठी अशा प्रकारच्या शिबीरांचे आयोजन केले जाते.

मुलींचे स्वतःचे आरोग्य, स्वच्छता, पोषक आहार, शिक्षण, तिच्यामधील कलागुणंाचा विकास व त्यासाठी संधी, कौटुंबिक – सामाजिक जाणिवा विकसित करणे, असे विविध विषय या शिबीरात घेतले जातात. मुलींना अशा शिबीराचा निश्चितच उपयोग असतो हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून समजते.

Translate »