दिवाळी फराळ वाटप

दिवाळीच्या आपल्या आनंदात आदिवासी मुलांनाही सहभागी करून घेण्यासाठी दिवाळी फराळ वाटपाचे कार्यक्रम घेतले जातात. दिवाळीच्या पहिल्या दिवशीच आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील मुलांना गाणी, गोष्टी, खेळ ह्याबरोबरच ताजा , चविष्ट फराळ देऊन शहरातील कार्यकर्ते त्या मुलांसोबत दिवाळीचा आनंद लुटतात. आकाश कंदिल बनवायला शिकविणे, रांगोळ्या काढणे असेही कार्यक्रम होतात. शहरातील कार्यकर्ते उत्साहाने व मोठ्या संख्येने ह्या कार्यक्रमास जातात.

Translate »