कुपोषण आणि आजारपण

नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव व अक्कलकुवा तालुका. सातपुड्यातील अत्यंत दुर्गम भागात राहाणारा आदिवासी समाज – कुपोषण आणि आजारपणामुळे होणारे शेकडो बालमृत्यू – हे भीषण वास्तव.

शबरी सेवा समिती सारख्या छोट्या संस्थेने हे आव्हान स्वीकारून पावले टाकायला सुरूवात केली. त्याला भक्कम आधार मिळाला शहादे येथील डाॅ.अलकाताई कुलकर्णी यांचा. शबरी सेवा समितीचे कार्यकर्ते दुर्गम भागात हिंडून आजारी व कुपोषित मुलांना जमा करुन शहाद्याला डाॅ. कुलकर्णी यांच्या दवाखान्यात दाखल करतात व डाॅ. अलकाताई व त्यांचे संपूर्ण कुटुंबिय आणि सहकारी त्यंचेवर उपचार करतात. प्रसंगी छोटी-मोठी आपरेशनही तिथेच होतात. 2010-11 पासून हे काम अव्याहतपणे सुरू आहे. आजपर्यंत हजारो मुलांचे प्राण अक्षरशः वाचले आहेत. कामाची गरज आणि नियमितता लक्षात घेता डाॅ.अलकाताईंनी त्यांच्या हाॅस्पिटलचा 10 ते 12 बेडचा एक वाॅर्ड शबरी सेवा समितीकडून आलेल्या मुलांसाठी राखून ठेवला आहे.

डाॅ. अलकाताईंचा निःस्वार्थ सेवाभाव, गाजावाजा न करता अखंडपणे चाललेला हा सेवायज्ञ आणि ‘शबरी’ च्या प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील कार्यकत्र्यांचे कठीण परिश्रम व असंख्य देणगीदारांचे आर्थिक पाठबळ यामुळेच संस्थेचे हे काम म्हणजे ‘‘रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा’’ या प्रकारचेच आहे.

Translate »