शबरी सेवा समितीचे माध्यमातून २०/१/१९ रोजी अळीव माळ तालुका जव्हार येथे ५६ गरीब वनवासी जोडप्यांचे सामुहिक विवाह सोहळा संपन्न झाला. जव्हार, मोखाडा, दादरा नगर हवेली, गुजराथ, वाडा, विक्रमगड ई भागातील ही जोडपी होती. ठाणे येथील अंजली काळे यांच्या मंडळाने पौरोहित्य केले. सर्व जोडप्यांना संसार उपयोगी भांडी, कपडे,ब्लँकेट अशा अनेक वस्तू भेट देण्यात आल्यात. उपस्थित २५०० मंडळींचे पुलाव, छोले व बुंदी लाडू असे छान जेवण झाले. डोंबिवली, ठाणे, वाशी, नाशिक, पालघर, मुंबई अशा अनेक ठिकाणाहून शबरी सेवा समिती चे कार्यकर्ते व हितचिंतक देणगीदार आले होते. गणपती पूजन, मंगलाष्टके, सप्तपदी असे हिंदू धर्मातील प्रमुख विवाह विधी व्यवस्थित रीतीने पार पडले. एवढा मोठा भव्य कार्यक्रम अत्यंत शिस्तीत व वेळे नुसार संपन्न झाला. सर्व विधी, व उपस्थित २५०० मंडळींचे जेवण दुपारी २ पर्यंत पूर्ण झाले. शबरी सेवा समितीचे सर्व कार्यकर्ते गेले महिनाभर या कार्यक्रमासाठी धडपड करीत होते. एवढा भव्य कार्यक्रम अत्यंत शिस्तीत व नियोजित वेळेत पूर्ण झाल्या बद्दल सर्वांना आश्चर्य वाटले. अनेक देणगी दारांनी त्यांच्या देणगीचा अत्यंत योग्य विनियोग होत असल्या बद्दल संस्थे बद्दल १०१ टक्के विश्वास व्यक्त केला व संस्थेला पुढील काळात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

शबरी सेवा समिती तर्फे सूर्यनमस्कार स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले. कार्यकर्त्यांचे प्रयत्न आणि विविध शाळेतील शिक्षक वर्गाचा सहभाग या मुळे शाळांची व सहभागी विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली. आयोजन करणे सोपे व्हावे म्हणून काही शाळांनी दिनांक ३१ डिसेंबर पासूनच स्पर्धा सुरू केल्या. सातपुड्याच्या अति दुर्गम भागात सुद्धा स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. नोंदणी झालेल्या शाळांची संख्या १०३ च्या वर गेली आहे. शिरपूर मधील शबरीची कार्यकर्ती विमल पावरा हीचा अनुभव खूपच बोलका आहे. गार बर्डी या शाळेत ती सूर्य नमस्कार शिकवण्यास गेली तर त्या ठिकाणी आधीच ३/४ अन्य शाळांचे शिक्षक हजर होते. विमल कडून त्यांनी सूर्य नमस्कार कसे घालायचे हे समजून घेतलेच शिवाय स्पर्धेच्या अटी- नियम यांची माहिती घेतली आणि वर सांगितले की आम्हाला बक्षिसे नाही दिली तरी चालेल फक्त प्रमाण पत्र द्या.

दिनांक ३१ डिसेंबर व १ जानेवारी अश्या २ दिवसात एकूण १६ शाळेत स्पर्धा पूर्ण झाल्यात. सर्व मिळून ९६१ विद्यार्थी सहभागी झाले. सर्वात अभिमानाची बाब म्हणजे स्पर्धेत सहभागी मुलींची संख्या ५०८ तर ४५३ मुले सहभागी झाले.
भोईर वाडी व खंदन तालुका कर्जत येथील मुलींनी त्या गटातील मुलांचे बरोबरीने म्हणजे ५१ व ५५ असे नमस्कार घातले. या मुली इयत्ता चौथीत शिकणाऱ्या आहेत. येथेही मुलींनी चिकाटीने आणि परिश्रमाने मुलांना गाठले आहे.
आपल्या व्यायाम प्रकारातील सूर्यनमस्कार हा प्रकार अगदी तळागाळात जावून तेथे रुजावा म्हणून शबरी सेवा समितीची ही धडपड सुरू आहे.

शबरी सेवा समितीच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग दि. 22 ते 25 नोव्हें. 2018 असा कशेळे केंद्रावर अतिशय उत्साहात संपन्न झाला. नंदुरबार, धुळे, जळगांव , नाशिक, पालघर, व रायगड अशा सहा जिल्ह्यातील 10 तालुक्यातून 26 महिला व 14 पुरूष कार्यकर्ते वर्गात पूर्णवेळ उपस्थित होते. 6 कार्यकर्ते काही कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत.
शिक्षण , आरोग्य , ग्रामविकास , महिला सक्षमीकरण , धर्मजागरण इ. विविध विषयांवर सविस्तर चर्चा होऊन या स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्य विस्ताराचा आगामी संकल्प तयार केला .
वर्गाचे वैशिष्ठ्य म्हणजे संपूर्ण वर्गाचे नियोजन व व्यवस्था या वनवासी कार्यकर्त्यांकडे होत्या. महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने असल्याने प्रत्येक विषयातील चर्चेत त्यांचा सहभाग हा आत्मविश्वासपूर्ण असा होता.
आगामी काळात कुपोषण निर्मूलनाच्या कामाबरोबरच शेतक-यांना सिंचनासाठी विहीरी करून देणे , प्राथमिक शिक्षणातील गुणवत्ता विकास , महिला सक्षमीकरण , फलोद्यान व वनीकरण इ. विषयांवर जास्त भर देण्यात येणार आहे.
शिबीरात कुपोषण निर्मूलनाचे नंदुरबार जिल्ह्यातील कार्यावर आधारित एक “अहवाल-पुस्तिका ” प्रकाशित करण्यात आली.
वर्गाचा समारोप डाॅ. मधुकर आचार्य , मा. संघचालक, नाशिक जिल्हा-ग्रामीण यांचे प्रभावी मार्गदर्शनाने झाला

शबरी सेवा समितीने या दिवाळी त नेहमी प्रमाणेच ६ शाळा व १० वाड्यांतील ९५० ते १००० मुलांच्या बरोबर दिवाळी साजरी केली . दिनांक २ ते ८ असे सलग ६ दिवस डोंबिवली ठाणे ,कल्याण ,वाशी,कर्जत अशा ठिकाणाहून नागरिक व संस्थेचे अनेक कार्यकर्ते आले होते . या ऊपक्रमात सहभागी होणार्यांच्या प्रतिक्रिया खुप बोलक्या आहेत . लाडू चिवडा शंकरपाळे करंज्या मिठाई खेळणी असे खुप काही आपण या मुलांना दिले .आदिवासी वनवासी मुलांच्या आनंदात सहभागी होण्यात एक दिवस सार्थकी लागला या आनंदात प्रत्येक जण होता.

जि.प.शाळा, सुगवे येथील हस्तकला प्रशिक्षण कार्यक्रम. 45 मुलांनी प्रत्यक्ष कागदाच्या वस्तू बनविल्या. पण नंतर  छोट्या मुलांनीही सहभागी होऊन आनंद लुटला.
आज दिनांक 2 नोव्हेंबर2018 रोजी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाव येथे आकाशकंदील बनवण्याचा उपक्रम घेतला,
मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळाला, प्रेरणा शबरी सेवा समितीने दिली,सलग 5 वर्षा पासून उपक्रम राबविण्यात येत आहे

शबरी सेवा समिती तर्फे..कोठिंबे ( नेरळ जवळ) आदिवासी  भागातील शाळेतील मुलांना क्राफ्ट मधे  ‘कागदाची करामत’ या कार्यक्रमाद्वारे *श्री.वैभव चाळके* यांनी मुलांना विविध कलाकृती शिकवल्या. सर्व मुले खुश झाली.

ग्रामीण व वनवासी, आदिवासी समाजात वाचनाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. एक तर महिलांना वेळ नसतो. व वेळ असला तर आवर्जून वाचावे असे त्यांना वाटत नाही. वाचनाची आवड मुळात निर्माण करावी लागते. घर व शाळेतून ही आवड जोपासली गेली पाहीजे. एखाद्याला वाचावेसे वाटले तरी चांगले काही त्याच्या समोर नसते. आपण शबरी सेवा समितीच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे पुस्तक हंडी च्या द्वारे वाचन संस्कृती रुजावी हा प्रयत्न करीत आहोत. अनेक शाळेत त्या द्वारे शेकडो पुस्तके आपण विनामूल्य दिलेली आहेत. त्यातील काही  शाळेत वाचनालय सुद्धा सुरु झाले आहे। 
या वर्षी आपण " एक कार्यकर्ता  एक फिरते वाचनालय" हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. संस्थेचे 45 कार्यकर्ते वनवासी क्षेत्रात नियमीत प्रवास करतात.प्रत्येका कड़े 25 गोष्टींची नविन पुस्तके दिली आहेत. त्यांनी प्रयत्न पूर्वक महिला, युवती, युवक, मध्यमवयीन शेतकरी यांना ती पुस्तके विनामूल्य वाचनास द्यायची आहेत. प्रारंभी साधी सोपी  गोष्टींची, सचित्र, लहान पुस्तके देवून आवड निर्माण करता येइल.  दि २० ऑगस्ट पासून आपण हा उपक्रम सुरु केला आहे. धड़गाव, अक्कलकुवा, शिरपूर, जव्हार, कर्जत मधील 23 कार्यकर्त्यां कड़े ही नविन पुस्तके दिली आहेत. पुस्तके वाचणारे यांच्या नोंदी ठेवणार आहोत.  पुढे त्या संदर्भात अनेक उपक्रम मनात आहेत. पण महिलांना वाचण्यास  सहजतेने ऊपलब्ध व्हावे असा हा ऊपक्रम.
जि.प. शाळांमध्ये जाऊन मुलांना कागदाची फुले , फुलपाखरे , होड्या तयार करणे , चित्र रंगवणे , गाणी, गोष्टी यातून त्यांना शाळेत येण्याची गोडी निर्माण करण्याचे काम शबरीचे कार्यकर्ते करत आहेत

दि.7 व 8 जून 2018 रोजी शिरपूर तालुक्यात सांगवी व मोईदा येथे विद्यार्थी विकास शिबीरे घेण्यात आली. दोन्ही ठिकाणी 50 /50 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. खेळ, गाणी, गोष्टी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

दि. 7 जून 2018 रोजी सेमल्या ता. शिरपूर येथे विद्यार्थी व युवकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पारंपारिक नृत्य ते आधुनिक नाच असे विविध प्रकारचे नाच या ठिकाणी सादर करण्यात आले. सांगवी, रतनपाडा, मोईदा, सेमल्या व दोंदवाडा या गांवातील युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सेमल्या गावातील लहान मुलांपासून ते आबाल वृद्धांपर्यंत सर्व जणं कार्यक्रम पाहायला आले होते. चार तास चाललेल्या या कार्यक्रमात सर्व रंगून गेले होते.

धडगांव तालुक्यात खुंटामोडी येथे दि. 9 जून रोजी विद्यार्थी विकास शिबीरे घेण्यात आली. दोन्ही ठिकाणी 30/40 विद्यार्थी यात सहभागी झाले होते. खेळ, गाणी, गोष्टी, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

11मार्च रविवार रोजी दहिवली कर्जत येथे 10 ते 15 जोडपे सामूहिक विवाह

पिम्पलखुटा गावात संस्थेने 65 हजार रु खर्च करुन ओहोळातून वाया जाणारे पाणी pvc pipelineद्वारे शेती कडे वळविले. त्या परिसरातील ९ शेतकऱ्यांची ५२एकर शेती या प्रकल्पा मुळे हिरवीगार झाली आहे. मका, गहू, हरभरा, कांदा,लसुण, भाजीपाला अशी विविध पिकांची लागवड तेथील आदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे.

आपण दिलेले हे आम्बा कलम। 3 वर्षात केवढे मोठे झाले आहे पहा। आपण आदिवासी समाजाला मदत केली आणि त्या माणसाने कष्टाने त्याचे सोने केले। सकारात्मक परिवर्तन म्हणतात ते हेच ना.

दि. 8 एप्रिल 2018 रोजी कशेळे येथे कुपोषित मुलांची तपासणी करण्यात आली. कर्जत तालुक्यातील 40 कुपोषित मुले आली होती. डाॅ. किरण मोरे हे बालरोग तज्ज्ञ आले होते. 

शबरी सेवा समिती तर्फे कर्जत तालुक्यातील 8 शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रत्येक शाळेसाठी १८ हजार रु. साहित्य दिले. नकाशे, विज्ञान साहित्य, पृथ्वी गोल, सुक्ष्मदर्शक, विविध खेल असा समावेश आहे. अशा प्रकारे ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यक्रमात संस्थेने या वर्षी खुप मोठी मजल गाठली आहे. कोठिंबे ZP शाळे करीता स्वच्छता गृह बांधण्यास सुरुवात केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा डोंगर रांगां मधील पिंपळखुटा गावातील आंबाईपाडा ही लहानशी वस्ती. गावातील ८० टक्के लोक जगण्या करिता गुजरात मध्ये स्थलांतर करतात. त्याच गावातील ६,७ परिवाराने एकत्र येऊन एक विहीर खोदली आहे. ३० फुट खोल व २३ फुट रुंद अशा या विहीरीस भरपूर पाणी लागले आहे. त्या पाण्यावर १० ते १२ एकर जमीन ओलिता खाली येईल. १० ते १५ कुटुंबांचे स्थलांतर थांबेल. ते स्वावलंबी होतीलच पण अन्य अनेक परिवाराला धडपड करण्याची प्रेरणा देतील

शबरी सेवा समितीने 2005 मधे तेलंगवाडी ता. कर्जत येथे एक बोअर वेल तयार करुन दिली. आजही ही बोअरवेल चांगल्या स्थितीत आहे. संपूर्ण गाव वर्ष भर त्या पाण्यावर अवलंबून आहे

2013 मध्ये जांभुळवाडी येथे लोक सहभागातून विहीर तयार केली. ७०० ते ८०० लोकवस्तीची तहान ही विहीर भागवत आहे व पुढील ४०-५० वर्षे ही विहीर आमची तहान भागवेल असे ग्रामस्थ सांगतात.

२०१५ मध्ये वावी ता. धडगाव जि नंदुरबार येथे सातपुड्याच्या डोंगराळ क्षेत्रातील ही विहीर आपण पूर्ण केली. ४ पाड्यातील लोक तीव्र पाणी टंचाईत या विहीरीतून पाणी भरतात. त्या शिवाय नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत ७/८एकर शेतीस सिंचनाचे पाणी या विहीरीतुनच पुरविले जाते.

वावी येथील येथील विहिरीच्या पाण्यावर शेतकरी भाजी पाला व इतर उन्हाळी धान्य पिकवितात.

पवनराई बंधारा — मेढा ता जव्हार. 

नोव्हेंबर २०१७ मध्ये कुंडापाडा / सुरगस येथे पाईप द्वारे 25 ते 30 एकर जमीनीस सिंचन व्यवस्था ऊपलब्ध करुन दिली. 

Translate »