आगामी उपक्रम

  • कार्यकर्ता अभ्यासवर्ग निमंत्रण - शबरी सेवा समितीच्या कार्याचा विस्तार आता 12 तालुक्यातील शेकडो गांवांपर्यंत झाला आहे. वनवासी क्षेत्रात राहाणा-या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आपल्या कार्याचा विस्तार झाला आहे. एखादी लहानशी बालवाडी ते वृक्ष लागवडीसारखा मोठा कार्यक्रम असे शिक्षण, आरोग्य, प्रबोधन, स्वावलंबन, कृषीविकास असे विविध आयाम आपल्या कार्यात आहेत. आपले सर्व कार्यकर्ते खूप तळमळीने हे कार्य करीत आहेत. पण तरीही त्यांचे नियमित प्रशिक्षण सुद्धा आवश्यक असते. या वर्षी गुरूवार दि. 22 नोव्हें ते रविवार दि. 25 नोव्हें. असा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग कशेळे केंद्रावर आयोजित केला आहे. यावल, शिरपूर, नंदुरबार,जव्हार, कर्जत असे सर्व कार्यकर्ते या काळात एकत्र येऊन आपल्या कार्यासंदर्भात चिंतन करतील. शबरी सेवा समितीचे शहरातील सर्व कार्यकर्ते , देणगीदार, हितचिंतक यांनी या काळात आपल्या सवडीनुसार या अभ्यासवर्गास भेट द्यावी, ही विनंती. या कार्यकर्त्यांच्या संवादातून आपल्या कार्याचा विस्तार कसा होत गेला, तेथील अडचणी काय असतात, हे समजू शकेल. दि. 22 नोव्हें. सकाळी 9 वा. वर्गाचे उद्घाटन व दि. 25 नोव्हें. रोजी दुपारी 3 वाजता. समारोप असा कार्यक्रम आहे.
Translate »