वनवासी क्षेत्रातील लाखो बालकांचे कुपोषण…या कुपोषणामुळे होणारे हजारो बालमृत्यू… हे दुर्दैवी चित्र बदलण्याचा आम्ही अगदी मनापासून प्रयत्न केला…
कुपोषण…बालमृत्यू… ते सुदृढ बालकांचा आनंदोत्सव !!
होय, अनेक वर्षाच्या अथक प्रयत्नाने आम्ही हे थक्क करणारे परिवर्तन घडवू शकलो !!! 

संस्थेविषयी...

एप्रिल २००३ पासून शबरी सेवा समितीच्या कार्यास प्रारंभ झाला. वनवासी क्षेत्रातील महिला व बालकांचे आरोग्य ह्या विषयावर लक्ष केंद्रित केले. सप्टेंबर २००३ मध्ये संस्थेची धर्मादाय आयुक्त मुंबई येथे नोंदणी झाली. तेंव्हापासून महाराष्ट्रातील जव्हार, मोखाडा, कर्जत, नंदुरबार अशा तालुक्यांतील दुर्लक्षित गावांमध्ये जाऊन तेथे विकासाचे प्रयत्न चालू केले

संस्थेच्या कार्यात तसेच योजनांना आपण सहकार्य करू शकता

Translate »